घाटकोपरमध्ये चार चिमुरड्यांना विषबाधा, दोघांचा मृत्यू

ही विषबाधेची घटना आहे की कुणी विषप्रयोग केला? 

Updated: Sep 25, 2018, 03:22 PM IST
घाटकोपरमध्ये चार चिमुरड्यांना विषबाधा, दोघांचा मृत्यू  title=

मुंबई : घाटकोपरमधल्या कामराज नगरमध्ये चार मुलांना विषबाधा झाल्याची माहिती मिळतेय.... यापैंकी दोघांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये साडे तीन वर्षांचा मुलगा आणि पाच वर्षांच्या एका मुलीचा समावेश आहे. इतर दोघांवर राजवाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कामराजनगरचे रहिवासी असलेल्या यादव कुटुंबीयांनी सकाळी चहा-पाव खाल्ला होता... त्यानंतर काही वेळातच कुटुंबातील सदस्यांना अस्वस्थ वाटू लागलं... विषबाधेमुळे नंदन इंदर यादव ही मुलगी तर किशोर इंदर यादव या चिमुरड्यांचा आपला जीव गमवावा लागला आहे. तर रोहित आणि कृष्णा यादव यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

ही विषबाधेची घटना आहे की कुणी विषप्रयोग केला? हा प्रकार नेमका कसा घडला याबद्दल पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.