मुंबई : वांद्रे टर्मिनस लगत पाण्याची पाईपलाईन फुटल्याने बाजूच्या झोपड्यांमध्ये पाणी घुसले. पाण्याचा वेग जोरात होता. त्यामुळे येथे पूरपरिस्थिती प्रमाणे पाणी झोपड्यांत शिरल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. दरम्यान, या पाण्याने दोन चिमुकल्यांचा बळी घेतलाय.
बांद्रा टर्मिनस जवळ ७२ इंचाची पाण्याची पाईपलाईन फुटली. या ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरु होते. मात्र, पाण्याचा वेग जास्त असल्याने नियंत्रण ठेवता आले नाही.
शेजारच्या झोपडपट्टीत पाणी शिरल्याने पाण्यात बुडून मुलांचा मृत्यू. बांद्रा टर्मिनस इथे दुरुस्तीचे काम सुरु होते. पाण्याची पाईपलाईन फुटून झालेल्या दुर्घटनेत दोन मुलांचा मृत्यू
झाला. ८ महिन्यांचा मुलगा व नऊ वर्षांच्या मुलगी यांचा यात समावेश आहे.