उदयनराजे भोसलेंना अटक होण्याची शक्यता

खासदार उदयनराजे भोसलेंचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळून लावलाय त्यामुळे त्यांना कधीही अटक होण्याची शक्यता बळावलीय. 

Updated: Jul 19, 2017, 11:55 AM IST
उदयनराजे भोसलेंना अटक होण्याची शक्यता title=

मुंबई : खासदार उदयनराजे भोसलेंचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळून लावलाय त्यामुळे त्यांना कधीही अटक होण्याची शक्यता बळावलीय. 

मुंबई उच्च न्यायालयानं उदयनराजेंचा जामीन अर्ज फेटाळून लावलाय. उदयनराजे यांच्यासहीत इतर नऊ जणांवर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सातारा जिल्ह्यातील लोणंद शहराजवळ 'सोना अलाईज' नावाची कंपनीत उदयनराजे यांच्या नेतृत्वात काम करणारी एक माथाडी कामगार संघटना आहे. याच कंपनीत दुसऱ्या संघटनेचे नेतृत्व रामराजे निंबाळकर करतात.

कंपनी रामराजेंच्या संघटनेला झुकते माप देते, असा आरोप करत उदयनराजेंनी १८ फेब्रुवारीला कंपनीचे अधिकारी राजकुमार जैन यांना सातारा विश्रामगृहात बोलावलं... आणि सहकाऱ्यांसोबत जैन यांच्यावर हल्ला करण्यात आला. यावेळी, आपल्याला मारहाण करण्यात आली तसंच काही ऐवज काढून घेतला गेला, अशी तक्रार जैन यांनी सातारा पोलीस ठाण्यात केलीय. यावरून उदयनराजे आणि त्यांच्या साथीदारांवर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.