मुख्यमंत्री कोण होणार ? उद्धव ठाकरे आणि सेनेच्या विजयी उमेदवारांची मातोश्रीवर बैठक

सत्ता समीकरणं ठरवण्यासाठी आज मातोश्रीवर बैठक

Updated: Oct 26, 2019, 07:43 AM IST
मुख्यमंत्री कोण होणार ? उद्धव ठाकरे आणि सेनेच्या विजयी उमेदवारांची मातोश्रीवर बैठक title=

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज शिवसेनेच्या निवडून आलेल्या उमेदवारांची आज मातोश्रीवर बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा होणार आहे. तसेच या बैठकीत सत्तेची समीकरण ठरवण्यासंदर्भात उद्धव ठाकरे सर्व आमदारांचा कल जाणून घेतील. भाजपसोबत जायचं असेल तर कोणत्या अटी ठेवायच्या.

५०-५० टक्के फॉर्म्युल्यावर ठाम राहायचं की १९९५चा फॉर्म्युला राबवायचा. तसेच काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाहेरून पाठिंबा घेवून सरकार केल़्यास काय होईल ? याबाबतही आमदारांचा कल घेतला जाईल. विधिमंडळ गटनेता निवडीबाबतही चर्चा होवू शकते.

भाजप-शिवसेना महायुतीला १६२ जागा मिळून स्पष्ट बहुमत मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने १०५ तर  शिवसेनेने ५६ जागांवर बाजी मारली आहे. ही विधानसभा निवडणूक ठाकरे घराण्यासाठी फार महत्वाची होती.

करण ठाकरे घराण्याचा पहिला व्यक्ती युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. वरळी मतदारसंघातून विजयी होवून आदित्य ठाकरे विधानसभेत जाणारे पहिले ठाकरे ठरले आहेत.