मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने एकत्र येऊन महाराष्ट्र विकास आघाडीने राज्यात सरकार स्थापन केलं. यानुसार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांच्यासह, सहा मंत्र्यांना शपथ घेतली. आता महाराष्ट्र विकास आघाडीकडून उद्याच विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे, आणि उद्याच विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे, ही बहुमत चाचणी उद्या पार पडणार आहे.
महाराष्ट्र विकास आघाडीला बहुमत सिद्ध करण्यासाठी 145 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. यात महाराष्ट्र विकास आघाडीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेससह इतर पक्ष आणि अपक्षांचा देखील समावेश आहे. महाराष्ट्र विकास आघाडीत एकूण 173 सदस्य आहेत.