मुंबई : गेल्यावेळच्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या शपथविधी सोहळ्यापेक्षा यावेळचा उद्धव ठाकरे सरकारच्या शपथविधी सोहळ्याला तिप्पट खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांचा मुंबईतल्या शिवाजी पार्कवर शपथविधी सोहळा झाला. या सोहळ्यासाठी तब्बल दोन कोटी ८९ लाख ७ हजार ३७४ रुपये खर्च करण्यात आल्याचं समोर आलंय.
२०१४ साली वानखेडे स्टेडियमवर झालेल्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या शपथविधी सोहळ्याला ९८ लाख ३७ हजार ९५० रुपये खर्च झाला होता. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी फुलांच्या सजावटीचा खर्च ३ लाख ३ हजार २५७ रुपये तर इलेक्ट्रिक कामासाठीचा खर्च २ कोटी ७६ लाख ४ हजार ११७ रुपये झाल्याचं माहितीच्या अधिकारात समोर आलंय.
विशेष म्हणजे २०१२ पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचा खर्च किती झाला याची माहिती नाही. कारण खर्चाच्या फाईल्स २१ जून २०१२ ला मंत्रालयाला लागलेल्या आगीत जळून खाक झाल्याचं सांगण्यात आलंय.