'...म्हणून मुंबई सुरळीत झाली'

मुंबईत कालच्या पावसामुळं महापालिकेच्या नालेसफाईचा पर्दाफाश झालाय. 

Updated: Aug 30, 2017, 05:20 PM IST
'...म्हणून मुंबई सुरळीत झाली' title=

मुंबई : मुंबईत कालच्या पावसामुळं महापालिकेच्या नालेसफाईचा पर्दाफाश झालाय. याबाबत विचारले असता उद्धव ठाकरेंनी राजकारण न करण्याचं आवाहन केलं.  कुणी राजकारण करत असेल तर आपणही राजकारण करण्यासाठी सज्ज असून तेच राजकारण त्यांच्यावर उलटवू शकतो असा इशाराही दिला.

नालेसफाई व्यवस्थित झाली म्हणूनच मुंबई सुरळीत आहे. महापौर आणि आमदारांनी स्वत: पाण्यात उतरून लोकांना मदत केली. २५ ते ३० हजार लोकांना सेनेच्या कार्यकर्त्यांनी अन्न आणि आसऱ्यासाठी मदत पुरवली, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. निसर्गाशी एका मर्यादेपर्यंतच लढता येतं, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. यावेळी मात्र ते महापालिकेचं कौतुक करायला विसरले नाहीत. २६ जुलै २००५ च्या तुलनेत यावेळी कमी नुकसान झाल्याचा दावा करत दुस-याच दिवशी मुंबई सामान्य झाल्याचं त्यांनी नमूद केलं.

मिठी नदीचं खोलीकरण आणि रुंदीकरण व्यवस्थित झाल्यामुळे कालच्या पावसामध्ये पाणी तुंबलं नाही, असं मनपा आयुक्त अजॉय मेहता म्हणाले. उद्धव ठाकरे आणि अजॉय मेहता यांनी काल झालेल्या पावसाबद्दल मुंबई महापालिकेची पाठ थोपटली.