मुंबई : महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणारे उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चुलत भाऊ राज ठाकरे हे मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. उद्धव हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांना संपूर्ण कुटुंबासमवेत येण्याचे आमंत्रण देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सकाळी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरेही होत्या. राज्यपाल कोश्यारी यांना पुष्पगुच्छ देऊन उद्धव आणि रश्मी ठाकरेंनी त्यांचं स्वागत केले. उद्धव ठाकरे उद्या मुख्यमंत्रिपदाची शिवतीर्थावर शपथ घेणार आहेत. ठाकरे घराण्यातील पहिला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच्या रुपाने महाराष्ट्राला मिळणार आहे.
Breaking news । उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला राज ठाकरे हे उपस्थित राहण्याची शक्यता । उद्धव राज यांना निमंत्रण देण्याची शक्यता - सूत्रhttps://t.co/dNmVe4G9Pp#Maharashtra #सत्तासंघर्ष #Shivsena @OfficeofUT #MaharashtraPolitical pic.twitter.com/DF1KUxXHOp
— ZEE २४ तास (@zee24taasnews) November 27, 2019
दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार उद्धव हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासह अनेक नेत्यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण पाठवू शकतात.
सोमवारी उद्धव ठाकरे यांना शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने स्थापन केलेल्या महाराष्ट्र विकासआघाडीने विधानसभेचे नेते म्हणून निवडले. मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये महाराष्ट्र विकासआघाडीचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर उद्धव यांनी त्यांचे आशीर्वाद घेऊन शरद पवारांच्या पायाला स्पर्श केला. आपल्या मोठ्या भावाला (पंतप्रधान नरेंद्र मोदी) भेटण्यासाठी ते दिल्लीला जातील, असेही यावेळी त्यांनी म्हटले. यानंतर 'महाराष्ट्रविकासआघाडी'च्या आमदारांनी आणि नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र देऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (उद्धव ठाकरे) यांना आपला नेता घोषित केल्याचे कळविले आहे.