मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे. भाजपचा उल्लेख सापाचं पिल्लू असा करत या सापाच्या पिल्लाला 30 वर्षे दूध पाजलं, आता ते वळवळ करतंय. अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी टीका केली.
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजप आणि शिवसेनेतील वादाचे रुपांतर मोठ्या संघर्षात झाले आहे. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारी तपास यंत्रणा एकमेकांच्या नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा लावत आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. सापाच्या पिल्लाला 30 वर्षे दूध पाजलं, आता ते वळवळ करतंय असा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर टीका केली.
केंद्रीय तपास यंत्रणांच्या छाप्यांमुळे दबून न जाता आक्रमकपणे तोंड देऊ असं ते यावेळी म्हणाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला छगन भुजबळ यांच्या रामटेक या निवासस्थानी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर घेण्यात आलेल्यी बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.