म्हाडाच्या जागेवर 60 अनधिकृत होर्डिंग्ज; मुंबई महापालिकेला जाहिरात फलक हटवण्याची सूचना

Mumbai: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर म्हाडाने म्हाडाने मुंबईसोबत राज्यभरातील म्हाडाच्या अभिन्यासातील म्हाडाच्या मालकीच्या जागेवरील जाहिरात फलकांचे सर्वेक्षण करण्याचं आदेश सर्व मंडळांना दिले आहेत.

सुरभि जगदीश | Updated: Jun 4, 2024, 06:51 AM IST
म्हाडाच्या जागेवर 60 अनधिकृत होर्डिंग्ज; मुंबई महापालिकेला जाहिरात फलक हटवण्याची सूचना title=

Mumbai: मुंबईत लावण्यात येणाऱ्या जाहिरात फलकांबाबत एक मोठी बातमी आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या विविध ठिकाणी म्हाडाच्या मालकीच्या जागेवरील जाहिरात फलकांचे सर्वेक्षण सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत 60 जाहिरात फलक अनधिकृतरित्या लावण्यात आलेलं निदर्शनास समोर आलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या परवानगीने हे फलक लावण्यात आले आहेत. मात्र तरीही यासाठी नियमानुसार, मुंबई मंडळाचं ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेण्यात आलं नसल्याचं समोर आलं आहे. 

दरम्यान याबाबत आता याची मुंबई मंडळाने गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात पालिकेला पत्र पाठवून तात्काळ जाहिरात फलक हटवण्याची सूचना केली असून येत्या काही दिवसांत पालिकेने हे फलक हटवले नाहीत, तर मुंबई मंडळातर्फे हे फलक हटवण्याची कारवाई करण्यात येणार आहे. 

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर म्हाडाने म्हाडाने मुंबईसोबत राज्यभरातील म्हाडाच्या अभिन्यासातील म्हाडाच्या मालकीच्या जागेवरील जाहिरात फलकांचे सर्वेक्षण करण्याचं आदेश सर्व मंडळांना दिले आहेत. या आदेशानुसार मुंबई मंडळाच्या काही विभागांचे सर्वेक्षण पूर्ण झालं आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. 

या अहवालानुसार मुंबई शहर आणि वांद्रे विभागात एकूण 65 जाहिरात होर्डिंग आढळलेत. यामध्ये पाच फलक वगळले तर उर्वरित ६० जाहिरात फलकांसाठी मुंबई मंडळाचं ‘ना हरकत’ प्रमाणपत्र नसल्याचं सर्वेक्षणात स्पष्ट झालंय. मिळालेल्या माहितीनुसार, हे 60 होर्डिंग्स वांद्रे विभागातील आहेत. 

मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या सांगण्यानुसार, म्हाडाच्या जागेवर किंवा अभिन्यासात जाहिरात फलक लावण्यासाठी मुंबई मंडळाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेणं बंधनकारक आहे. असं असूनही 60 जाहिरातांचे होर्डिंग्जसाठी मुंबई मंडळाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेण्यात आलं नाही. त्यामुळे सर्व्हेक्षणात हे फलक अनधिकृत असल्याचं नमूद केलं आहे. या सर्वेक्षणाच्या अुषंगाने 60 अनधिकृत जाहिरात फलक तात्काळ हविण्यासंबंधी मुंबई मंडळाने पालिकेला पत्र पाठवण्यात आलं आहे. पालिकेने येत्या काही दिवसात हे फलक हटवले नाही तर मुंबई मंडळाकडून जाहिरात फलक हटवण्याची कारवाई केली जाईल.