विद्यापीठाची आर्थिक स्थिती भक्कम, गैरप्रकार नाही - संजय देशमुख

कॉरप्स फंड कधीही मोडला नाही आणि मोडणार नाही असंही देशमुख यांनी सांगितले. 

Updated: Jul 7, 2017, 06:57 PM IST
विद्यापीठाची आर्थिक स्थिती भक्कम, गैरप्रकार नाही - संजय देशमुख title=

मुंबई : मुंबई विद्यापीठ आर्थिक स्थिती भक्कम आहे, त्यात कोणताही गैरप्रकार नाही, असे मुंबई कुलगुरू संजय देशमुख यांनी झी चोवीस तासला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.  कॉरप्स फंड कधीही मोडला नाही आणि मोडणार नाही असंही देशमुख यांनी सांगितले. 

कुलगुरु डॉ संजय देशमुखांनी मुंबई विद्यापीठाच्या १११ कोटींच्या ठेवी मुदतीपूर्वीच वटवल्याचं समोर आलंय. अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करणाऱ्या मुंबई विद्यापीठाचा आर्थिक मनोरा अडचणीत आहे.

गेल्या २२ महिन्यात आर्थिक चणचण भासताच १११ कोटींच्या ठेवी मुदत संपण्यापूर्वीच वटविल्याची धक्कादायक कबुली मुंबई विद्यापीठाने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिलेल्या माहितीवरुन उघडकीस आली आहे. 

मुंबई विद्यापीठाच्या तिजोरीत ठणठणाट असतानाही अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आकडे फुगविल्याचे स्पष्ट होत आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई विद्यापीठाकडे विविध बँकेतील ठेवी तसेच मुदतपूर्वीच तोडलेल्या ठेवीची माहिती विचारली होती.

मुंबई विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागाने अनिल गलगली यांना १ जुलै २०१५ पासून ३१ मे २०१७ पर्यंतची माहिती दिली.