संतूरवादक पंडित उल्हास बापट यांचे निधन

ज्येष्ठ संतूरवादक पंडित उल्हास बापट यांचे आज सायंकाळी मुंबईत निधन झालेत. ते ६७ वर्षांचे होते. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

Updated: Jan 4, 2018, 07:31 PM IST
संतूरवादक पंडित उल्हास बापट यांचे निधन title=

मुंबई : ज्येष्ठ संतूरवादक पंडित उल्हास बापट यांचे आज सायंकाळी मुंबईत निधन झालेत. ते ६७ वर्षांचे होते. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

संगीत दिग्दर्शक आर. डी. बर्मन यांच्या गाजलेल्या अनेक गाण्यांसाठी संतूरवादन उल्हास बापट यांनी केले आहे. १९८७ मध्ये 'घर' या चित्रपटाच्या संगीतासाठी संतूरवादन करून पंडित उल्हास बापट यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत पर्दापण केले. त्यानंतर आर. डी. बर्मन आणि पंडित उल्हास बापट यांची घट्ट मैत्रीच जमली. 

आर. डी. बर्मन यांच्यासोबत त्यांनी अनेक गाण्यांच्या संगीत सात दिली. १९४२ ए लव्ह स्टोरी आणि जैत रे जैत या चित्रपटांतील संगीतातही पंडित उल्हास बापट यांनी संतूरवादन केले आहे. 

तसेच पंडित नारायण मणी यांच्याबरोबर पंडित उल्हास बापट यांच्या ध्वनिमुद्रित संतूरवादनाचे इन कस्टडी ॲन्ड कॉन्व्हरसेशन्स नावाचे दोन अल्बम प्रकाशित झालेत.