वाह क्या बात है... खरंच सॅल्युट! वर्दीतली माणुसकी पाहून तुमचेही डोळे पाणवतील

नुकतेच मुंबई पोलिसांच्या एका जवानाने एका वृद्ध दिव्यांगाचा हात पकडून त्याला रस्ता ओलांडायला मदत केली, तेव्हा लोकांनी त्याचे कौतुक केले.

Updated: Dec 16, 2021, 02:43 PM IST
वाह क्या बात है... खरंच सॅल्युट! वर्दीतली माणुसकी पाहून तुमचेही डोळे पाणवतील title=

मुंबई : मुंबई पोलीस लोकांना विविध सुरक्षा नियमांबद्दल, कधी फिल्मी शैलीत, तर कधी सोशल मीडियाच्या ट्रेंडमधून जागृती करीत असतात. कोरोनाच्या काळातही मुंबई पोलिसांनी ज्या प्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना जागरूक करण्याचे काम केले.

त्याचे खूप कौतुकही झाले. नुकतेच मुंबई पोलिसांच्या एका जवानाने एका वृद्ध दिव्यांगाचा हात पकडून त्याला रस्ता ओलांडायला मदत केली, त्यामुळे लोकं त्याचे खुप कौतुक करीत आहेत. अगदी आयएएस अधिकाऱ्यापासून ते समाजसेवक आणि सर्वसामान्य नागरिक या पोलिसाच्या कामाचे कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे.

व्हिडिओमध्ये काय आहे?

या व्हायरल क्लिपमध्ये मुंबईतील गजबजलेल्या अशा सीएसएमटी स्टेशनबाहेरील रस्त्यावर वाहने धावताना दिसत आहेत. दरम्यान, एक पोलीस गरीब दिव्यांगाचा हात धरून त्याला रस्ता ओलांडताना दिसत आहे. त्याला रस्ता ओलांडायला मदत करणारा पोलीसाचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. अनेक युजर्स म्हणताहेत. या पोलिसाला सलाम!

मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा जिंकली मनं!

हा व्हिडिओ मंगळवारी मुंबई पोलिसांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. 

ही क्लिप आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनीही शेअर केली आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले -Little act of Kindness..