एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर परदेशी खेळाडूंसोबत 'पार्टी'वर महापौरांचा हा खुलासा...

एलफिन्स्टन दुर्घटनेच्या दिवशी महापौर बंगल्यावर कुठलीही पार्टी झाली नाही, असा दावा मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केलाय.

Updated: Oct 2, 2017, 06:26 PM IST
एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर परदेशी खेळाडूंसोबत 'पार्टी'वर महापौरांचा हा खुलासा...  title=

मुंबई : एलफिन्स्टन दुर्घटनेच्या दिवशी महापौर बंगल्यावर कुठलीही पार्टी झाली नाही, असा दावा मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केलाय.

त्या दिवशी फूटबॉल टीमची आणि माझी भेट नियोजित होती. परदेशी फूटबॉल खेळाडू घरी आले. पाहुणे घरी आल्यावर त्यांचं आदरातिथ्य केलं... ती पार्टी नव्हती... केवळ स्नॅक्स दिले गेले... मेजवानी झालीच नाही, असा दावा महापौरांनी केलाय. 

त्याच वेळी आशिष शेलार यांच्यावही महाडेश्वरांनी आरोप केलेत. दुर्घटना घडली तिथे शेलार गेले नाहीत, उलट त्यांचे खासदार असंवेदनशीलपणे गरबा खेळत होते. आम्ही संवेदनशील आहोत, असा टोला महाडेश्वरांनी शेलारांना हाणलाय.