मुंबईतील सांडपाणी शुद्ध करून असं समुद्रात सोडलं जाणार

मुंबईमध्ये जमा होणारं सांडपाणी १०० टक्के शुद्ध करूनच समुद्रात सोडण्याचा प्रकल्प आकाराला येतोय. सिवेज ट्रिटमेंट प्लांटच्या उभारणीला सुरवात झाली आहे. 

Updated: Feb 19, 2018, 08:43 PM IST
मुंबईतील सांडपाणी शुद्ध करून असं समुद्रात सोडलं जाणार title=

मुंबई : मुंबईमध्ये जमा होणारं सांडपाणी १०० टक्के शुद्ध करूनच समुद्रात सोडण्याचा प्रकल्प आकाराला येतोय. सिवेज ट्रिटमेंट प्लांटच्या उभारणीला सुरवात झाली आहे. 

कधी होणार पूर्ण प्रकल्प?

२०२४-२५ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे. कुलाबा, घाटकोपर, वरळी, भांडुप, वांद्रे, धारावी, वर्सोवा आणि मालाड अशा आठ ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी ही केंद्रं उभी राहणार आहेत. त्यातल्या कुलाब्याच्या प्रकल्पाचं प्रत्यक्ष काम सुरू झालंय. 

रोगराईला आळा बसेल

अन्य ५ ठिकाणांसाठी निविदा काढण्यात आल्यात. यामुळे रोगराईला आळा बसेलच शिवाय समुद्राचं प्रदुषण आणि जीवसृष्टीला होणारी हानी टळणार असल्याचं महापालिकेचे कार्यकारी अभियंता डॉ. अजित साळवी यांनी सांगितलंय.