Mumbai Weather News : हुश्श! मुंबईवर धडकणाऱ्या चक्रीवादळानं बदलली दिशा; आता 'इथं' धोक्याचा इशारा

Mumbai Cyclone Tej : 'तेज' चक्रीवादळ नेमकं कोणत्या दिशेला निघालंय? पाहा मोठी बातमी आणि वादळाचं लाईव्ह लोकेशन. शहरावरील धोका टळला तरी आता वादळ कुठंय?  

सायली पाटील | Updated: Oct 20, 2023, 12:05 PM IST
Mumbai Weather News : हुश्श! मुंबईवर धडकणाऱ्या चक्रीवादळानं बदलली दिशा; आता 'इथं' धोक्याचा इशारा
weather update Cyclone tej out of mumbais border Most Likely to Move Towards Yemen or Oman latest update

Mumbai Cyclone Tej : भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या माहितीनुसार मुंबईवर मागील काही तासांपासून चक्रीवादळसदृश्य वारे घोंगावत असून हे वारे शहराच्या किनाऱपट्टी भागात धडकणार अशी भीत व्यक्त केली जात होती. पण, आता मात्र हा धोका टळला असून, वादळानं दिशा बदलल्याची माहिती स्पष्ट होत आहे. 

Add Zee News as a Preferred Source

सध्याच्या घडीला अरबी समुद्रामध्ये चक्राकार वादळांची निर्मिती झालेली असली तरीही त्याचं रुपांतर पूर्णपणे चक्रीवादळात झालेलं नाही. असं असलं तरीही भारताला या वादळाचा फारसा धोका पोहोचणार नसून ते ओमान आणि येमेनच्या दिशेनं पुढे जाताना दिसत आहे. 

 

अरबी समुद्रामध्ये तयार होणाऱ्या या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं निर्माण होणारी चक्रीवादळाची परिस्थिती पाहता अशा प्रकारची वादळं मान्सूनच्या मोसमानंतर बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात तयार होतात. भारतात मान्सून साधारणत: जून ते सप्टेंबरदरम्यान असतो, तर मान्सूननंतर सुरु होणारं वादळांचं सत्र ऑक्टोबर ते डिसेंबर या काळापुरता सीमीत असतं. 

हेसुद्धा वाचा : Moon Walk: चंद्रावर असा दिसतो फॅशन शो, Video पाहून म्हणाल कसलं भारीये हे!

 

2023 मध्ये आणखी कोणतं वादळं येणार? 

हवामान विभागाच्या माहितीनुसार हमून नावाचं चक्रीवादळ 2023 मध्ये धडकणार असल्याची शक्यता आहे. येणाऱ्या काही महिन्यांमध्ये हे वादळ धडकू शकतं. सर्वसामान्य माहितीनुसार चक्रीवादळांची निर्मिती बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात होते. सहसा या चक्रीवादळांचा लँडफॉल भारत, बांगलादेश, पाकिस्तान किंवा इराणमध्ये होतो. सध्या तयार होणाऱ्या चक्रीवादळाला भारताकडून 'तेज' हे नाव देण्यात आलं होतं. यापुढील म्हणजेच हमून आणि मिधीली या चक्रीवादळांना नाव देण्याचं श्रेय अनुक्रमे इराण आणि मालदीवला मिळेल. 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More