मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे आभार मानले आणि बैठकीतले आमदार उद्धव ठाकरे यांच्यातला विनम्रपणा पाहून थक्क झाले. उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी यापूर्वी सोनिया गांधी ते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे, हे सर्वांना माहित आहे. पण अजित पवार यांच्या बंडानंतर ज्या इर्षेने तीनही पक्ष एकत्र आले, आणि त्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री तो देखील, विचारसरणीचे पक्ष एकत्र येण्याचा हा क्षण ऐतिहासिक म्हटला जात आहे.
उद्धव ठाकरे आता महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हे पक्ष सोबत आले असल्याचं सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्र विकास आघाडीच्या या बैठकीनंतर तीनही पक्षाचे नेते राजभवनावर राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी निघाले आहेत.