'मराठी'साठी राज्य सरकारची 'विकिपीडिया'सोबत हातमिळवणी

महाराष्ट्र सरकारने मराठी भाषेच्या अधिक प्रसारासाठी आणि ई-माध्यमांमध्ये मराठीचा अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी 'विकिपीडिया'सोबत अनोखा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. आज मराठी भाषा दिनी ही घोषणा राज्य सरकारतर्फे करण्यात आली आहे.

Updated: Feb 27, 2018, 11:14 PM IST
'मराठी'साठी राज्य सरकारची 'विकिपीडिया'सोबत हातमिळवणी

मुंबई : महाराष्ट्र सरकारने मराठी भाषेच्या अधिक प्रसारासाठी आणि ई-माध्यमांमध्ये मराठीचा अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी 'विकिपीडिया'सोबत अनोखा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. आज मराठी भाषा दिनी ही घोषणा राज्य सरकारतर्फे करण्यात आली आहे.

या निर्णयामुळे आता विकिपीडियाच्या सहकार्याने मराठीचा जगभर प्रचार-प्रसार होणार आहे. जगभरातील मराठी भाषिकांशी जोडणारा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम असेल. 

विशेषत: अमेरिकेत स्थायिक मराठी बांधवांना महाराष्ट्रासोबतच मराठीशी जोडण्याचा व्यापक प्रयत्न यातून केला जाईल. विकिपीडियाच्या माध्यमातून विविध ब्लॉग लेखनासाठी अनिवासी भारतीय मराठी बांधवांना प्रोत्साहित करणे, आपल्या मूळ जन्मगावाशी संबंधित लेखन करणे आदी उपक्रम याअंतर्गत राबविण्यात येणार आहेत. विकिपीडियातर्फे प्रोजेक्ट पेजवर त्यांचा विशेष उल्लेख प्राप्त होईल.

अशा प्रकारचा हा उपक्रम राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार असून न्यूयॉर्कमध्ये मराठीच्या अधिकृत प्रसाराचे दालन यातून खुले होणार आहे.

विकीपीडियाच्या माध्यमातून मराठी भाषिकांना जोडणारा हा भाषिक वर्गवारीतील पहिला उपक्रम असेल. राज्य सरकारच्यावतीने सुद्धा जगभरातील अनिवासी भारतीय मराठी बांधवांना मराठीचे संवर्धन आणि प्रोत्साहन यासाठी चालना देण्यात येणार आहे.