मुंबई : मुंबई महापालिकेच्या नियमानुसार एकदा कुठेही कुणाचेही नाव दिले तर ते हटवता येत नाही. शौर्य म्हैसूर टिपू सुलतान यांचे नाव एका मैदान देण्याचे काम २०११ मध्ये एका भाजप नगरसेवकाने केले होते. हे नगरसेवक आता आमदार असून देवेंद्र फडणवीस त्यांचा राजीनामा घेणार का? असा खडा सवाल मंत्री अस्लम शेख यांनी केला आहे.
मालाड येथील एका मैदान टिपू सुलतान हे नाव देण्याच्या कारणावरून भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजप, विश्व हिंदू परिषद यांनी या नामांकरणाला विरोध केला आहे. त्यावरून मोठा राडा झाल्यानंतर अस्लम शेख यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर पलटवार केला.
एका स्लम विभागात मैदान निर्माण करणे हे चांगले काम आहे की वाईट? मात्र, केवळ निवडणुका आल्या आहेत म्हणून ते राजकारण करत आहे. २०११ साली एका भाजप नेत्याने एका चौकाला वीर टिपू सुलतान हे नाव दिलं होते. त्यामुळे त्या भाजप नेत्यांचा राजीनामा घेणार का? भाजपच्या पोटात आता अचानक का दुखू लागले? असा सवाल केला.
टिपू सुलतान यांच्या नावावरून गेल्या ७० वर्षात कधीही वादविवाद झाला नाही. मात्र, भाजपला विकासकामे नको त्यापेक्षा त्यांना नावाचे राजकारण महत्वाचे वाटते. आपल्या पिल्लाना सोडून भाजप हे बदनामीचे राजकारण करत आहे. मात्र, त्याआधी फडणवीसांनी प्रस्ताव ठेवणाऱ्या नगरसेवकाचा आणि मंजुरी देणाऱ्या आमदाराचा राजीनामा घ्यावा. तर त्यांची नियत साफ असल्याचे आम्ही समजू असे अस्लम शेख म्हणाले.
आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्या जिंकण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जात आहे. इथे झालेल्या या मैदानातील विकास कामाकडे पहा, नावाच्या वादात लक्ष देऊ नका. असा सल्लाही त्यांनी भाजपला दिलाय.
टिपू सुलतान हा देशाचा गौरव नाही - फडणवीस
हिंदुंचा छळ करणारा टिपू सुलतान हा देशाचा गौरव होऊ शकत नाही. त्यांचं नाव उद्यानाला देणं अयोग्य ठरेल, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दली आहे. मुंबई महापालिका टिपू सुलतानचे नाव उद्यानाला देऊन त्यांचं महिमा मंडन करत असून हे त्वरीत थांबवले पाहिजे, असे ते म्हणाले आहेत.