सर्वसामान्यांनी कार घेतली, तर एवढे पैसे आले कुठून? धमकीला दिलं हे उत्तर

सर्वसामांन्यांच यश हे समाजातील काही लोकांना खरंच पाहवत नाही. एखाद्या व्यक्तीने मेहनत करुन एखादी वस्तू खरेदी केली, तर त्याबाबत उलट सूलट चर्चा होते. 

Updated: Feb 27, 2022, 09:33 PM IST
सर्वसामान्यांनी कार घेतली, तर एवढे पैसे आले कुठून? धमकीला दिलं हे उत्तर title=

मुंबई : सर्वसामांन्यांच यश हे समाजातील काही लोकांना खरंच पाहवत नाही. एखाद्या व्यक्तीने मेहनत करुन एखादी वस्तू खरेदी केली, तर त्याबाबत उलट सूलट चर्चा होते. गैरमार्गने महागडी वस्तू खरेदी केली, अशी चर्चा रंगते. त्याबाबत उलटसुलट चर्चा होते. मात्र श्रीमंताने गैरमार्गाने पैसा कमावला तरीही त्याच्याबाबत गोड गोड बोललं जातं. गरीबाच पोट दुखू लागलं की कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र श्रीमंताचं पोट दुखू लागलं दादासाहेबांची तब्येत बिघडलीय असं म्हटलं जातं. समाजात प्रत्येक ठिकाणी अशा वृत्तीचं माणंस आपल्याला पावलोपावली भेटतात. (youtuber wife husband yogita and ganesh shinde are explain how to earned money) 

तर मुद्दा असा की, प्रसिद्ध मराठी यूट्युबर गणेश शिंदे (Ganesh Shinde), योगिता शिंदे (Yogita Shinde) आणि शिवानी शिंदे यांनी चार चाकी गाडी घेतली. पत्र्याच्या घरात राहिलेल्या, गरीबीची झळ सोसलेल्या या यूट्यूबरने गाडी घेतल्याने काही जणांना पोटदुखी सुरु झाली.

इतकी महागडी गाडी घेण्यासाठी तुमच्याकडे पैसे कुठून आले, असा प्रश्न शिंदे कुटुंबियांना विचारला जात आहे. इतकंच नाही, तर त्यांना धमकीचे फोनही केले जात आहेत. 

दरम्यान या शिंदे कुटुंबियांनी ही गाडी घ्यायला पैसै कुठून आले, याबाबतचं स्पष्टीकरण हे त्याच गाडीत बसून व्हीडिओद्वारे दिलं आहे.

आम्ही यूट्यूबवर जे व्हीडिओ शेअर करतो, त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून आम्ही हे पैसे कमावले आहेत. आम्हाला विविध कार्यक्रमांना बोलावलं जातं. त्यातून काही पैसे आम्हाला मिळतात. हे सर्व पैसे जमा करुन आम्ही गाडी घेतल्याचं शिंदे दाम्पत्याने स्पष्ट केलं आहे.  

सोशल मीडियामुळे घराघरात पोहचले   

सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून शिंदे कुटूंबिय आज अनेक जण घराघरात पोहचले आहेत. सोशल मीडियामुळे अनेक जणांना हक्काचं व्यासपीठ मिळालं आहे. याच सोशल मीडियामुळे गणेश शिंदे (Ganesh Shinde), योगिता शिंदे (Yogita Shinde) आणि शिवानी शिंदे (Shivani Shinde) यांना नवी ओळख मिळाली आहे. शिंदे दाम्पत्यांच्या व्हीडिओमधील साधेपणा हा सर्वसामांन्याना भावतो. तुम्ही आतापर्यंत यांचे अनेक व्हीडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. यांच्या व्हीडिओंना लाखोंच्या घरात असतात.