वीणा मलिक मुंबईतच...

अखेर वीणा मलिक मुंबईतल्या एका हॉटेलात असल्याचं निष्पन्न झालं आहे. गेले दोन दिवस वीणा मलिक बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली होती. वीणाने आपल्याला ताप येत असल्याने कोणाशी संपर्कात नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Updated: Dec 18, 2011, 12:21 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

अखेर वीणा मलिक मुंबईतल्या एका हॉटेलात असल्याचं निष्पन्न झालं आहे. गेले दोन दिवस वीणा मलिक बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली होती. वीणाने आपल्याला ताप येत असल्याने कोणाशी संपर्कात नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. वीणा मलिकचा विसा संपल्याने ती पाकिस्तानात गेल्याचं सांगण्यात येत होतं. काही जणांनी मात्र वीणाने पब्लिसिटी स्टंट केल्याचं मत व्यक्त केलं आहे.

 

दरम्यान पाकिस्तानी वादग्रस्त अभिनेत्री आणि बिग बॉसमुळे चर्चेत आलेली मॉडेल-अभिनेत्री वीणा मलिक गायब झाल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगत होती.. मात्र, आता या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळणार असंच दिसतं आहे. कारण, वीणा मलिक सापडल्याची चर्चा आहे… ती पाकिस्तानातच असल्याचं म्हटलं जातं आहे…

 

‘द नेशन’ या वृत्तपत्रानं ही माहिती दिल्याचं बोललं जातं आहे. तिच्या ‘मुंबई १२५ किमी’ या सिनेमाचं मुंबईत शुटिंग सुरु होतं.. मात्र, शुटिंग संपल्यानंतर सहा वाजल्यापासून तिचा ठावठिकाणा समजत नव्हता.. मात्र, आता ती पाकिस्तानात असल्याचं म्हटलं जातं आहे. इतकंच नाही तर विसा संपल्यानं ती पुन्हा पाकिस्तानात परतल्याचं म्हटलं जातं आहे.

 

त्यामुळे वीणा मलिक पाकिस्तानात गेली हे जवळजवळ निश्चित आहे. इंग्लिश वृत्तपत्र ‘द नेशन’ यांच्या माहितीनुसार वीणा पाकिस्तानात गेली असल्याचे म्हटले आहे. २४ तारखेला वीणा मलिकचा व्हिसा संपुष्टात येणार होता. गेल्या दोन दिवसांपासून ती मुंबईतील गोरेगाव भागातून मधून बेपत्ता होती. तिच्या सोबत अश्मित पटेल हा देखील तिच्यासोबत असल्याचे द नेशनने म्हटले आहे. वीणा अश्मित सोबत वाघा बॉर्डर पर्यंत गेली असल्यांचे सांगितले जात आहे.