अख्तरांच्या संगे क्लासिक लेजंडसचा जीवन प्रवास

Updated: Dec 6, 2011, 03:22 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

झी क्लासिकवर भारतीय सिनेमातल्या लेजंड्सवर आधारीत क्लासिक लेजंडस हा कार्यक्रम लवकरच पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचे अँकरिंग जावेद अख्तर यांनी केलं आहे. राज कपूर, आर.डी.बर्मन, मजरुह सुलतानपूरी, किशोर कुमार, नर्गिस, बिमल रॉय, अशोक कुमार, विजय आनंद, साहिर लुधिनयावी, मेहबूब खान, शम्मी कपूर, मधुबाला, गुरुदत्त या सारख्या दिग्गज व्यक्तिमत्वांचे चरित्र जावेद अख्तर उलगडून दाखवणार आहेत. जावेद अख्तर यांच्या मते या लेजंडसनी हिंदी सिनेमाला समृध्द केलं.

 

या कार्यक्रमाच्या संदर्भात जावेद अख्तर यांनी दिलेल्या मुलाखतीत मेहबूब खान यांच्या बद्दलची माहिती थक्क करणारी होती असं सांगितलं आहे. मेहबूब खान बडोद्याजवळच्या एका छोट्याशा खेडेगावातून वयाच्या १६ व्या वर्षी खिशात अवघे तीन रुपये असताना पळून आले होते आणि त्यानंतर त्यांनी कर्तबगारीने आपली नाममुद्रा हिंदी सिनेसृष्टीत उमटवली.

मेहबूब खान यांचा पहिला सिनेमा अलीबाब आणि चाळिस चोर हा होता आणि त्यात त्यांनी चाळीसव्या चोराची भूमिका केली होती. जावेद अख्तर यांनी या पैकी काही लेजंडस बरोबर काम केलं असल्याने हा कार्यक्रम दर्जेदार आणि रंगतदार होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

Tags: