कतरिनाचं यश; सलमानचा हात?

बॉलिवूडमधील नेहमीच चर्चेत राहिलेली सुपरस्टार जोडी अर्थात सलमान खान आणि कतरिना कैफ... कतरिनाला बॉलिवूडमध्ये आणण्यासाठी सल्लूचा हात आहे असं अनेकांना अजूनही वाटतंय... पण, खुद्द कतरिनाला काय वाटतंय याबद्दल... तर कतरिनाला वाटतंय की तिच्या यशात केवळ सलमानचा हात नाही...

Updated: Aug 7, 2012, 10:59 AM IST

www.24taas.com, मुंबई

बॉलिवूडमधील नेहमीच चर्चेत राहिलेली सुपरस्टार जोडी अर्थात सलमान खान आणि कतरिना कैफ... कतरिनाला बॉलिवूडमध्ये आणण्यासाठी सल्लूचा हात आहे असं अनेकांना अजूनही वाटतंय... पण, खुद्द कतरिनाला काय वाटतंय याबद्दल... तर कतरिनानं स्पष्ट केलंय की तिच्या यशाचं एकमेव कारण  सलमान खान नाही...

 

कतरिना आपल्या यशाचं पूर्ण श्रेय सलमानला देण्यास अजिबात तयार नाही. एका पत्रकार परिषदेत बोलताना, आपलं आणि सलमानचं समीकरणच वेगळं असल्याचं कतरिनानं मान्य केलंय. आम्ही खूप जुने मित्र आहोत पण मी अजूनही ‘सिंगल’ आहे, हे सांगायला ती विसरली नाही. यावर बॉलिवूडमधील तिच्या यशाच्या मागे सलमान खानचा कितपत हात आहे, असा आत्तापर्यंत अनेकांना पडलेला  प्रश्न तिला विचारला गेला... यावर कतरिनानं उत्तर दिलं की, ‘मी भाग्यवान आहे आणि मेहनत करणाऱ्या लोकांना देव नेहमीच मदत करत आसतो. तसंच लोकांनीही मला स्विकारलं आहे. परंतू खरं हेसुद्धा आहे, की सुरवातीच्या काळात सलमान खानमुळेच मला प्रसिद्धी मिळाली. माझ्या जीवनात सलमान खानचं मार्गदर्शन महत्त्वाचं ठरलं. सलमानला चित्रपट क्षेत्रातला दिर्घ अनुभव असल्यानं प्रत्येक वेळी मला त्याची मदत झालेली आहे. सलमाननं केलेल्या मदतीबद्दल मी त्याचे आभार मानते... पण, सलमान नसता तर मला बॉलिवूडमध्ये ब्रेकच मिळाला नसता, असं म्हणणं मात्र चुकीचं ठरेल’, असं म्हणत कतरिनानं आपल्या यशाचं पूर्ण श्रेय सलमानला द्यायला सरळसरळ नकार दिला.

 

कतरिना म्हणते, ‘चित्रपट क्षेत्रात सुरूवात करण्यासाठी प्रत्येकाला मदत लागतेचं आणि ती मदत मला सलमानकडून मिळाली हेही तितकंच खरं... सलमानलाही करिअरच्या सुरुवातीला सुरज बडजात्याकडून मिळाली होती. सलमाननं मला जशी मदत केली तशीच स्नेहा उल्लाल आणि जरिन खान यांनादेखील बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यासाठी मदत केलीय’ असं कतरिनानं स्पष्ट केलंय.  सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा ‘एक था टायगर’ हा अगामी चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार असून, त्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दोघेही फार बिझी आहेत.

 

.