क्रेझ 'रॉकस्टार' रणबीरची !

रॉकस्टारचं प्रमोशन करण्यासाठी रणबीर नुकताच पोहोचला जयपूरला.आणि त्याची एक झलक बघण्यासाठी हजारोंच्या संख्येने त्याच्या फॅन्सनी हजेरी लावली. रणबीरने स्टेजवर पाऊल टाकताच एकच जल्लोष झाला. त्याची एक झलक बघण्यासाठी हजारो फॅन्स इथे हजर होते

Updated: Oct 20, 2011, 02:34 PM IST

झी २४ ता वेब टीम, जयपूर

रॉकस्टार रणबीरचं फॅन फॉलोईंग दिवसेंदिवस वाढतच चाललंय. यंगिस्तानच्या या स्टारची एक झलक बघण्यासाठी त्याचे फॅन्स नेहमीच आतूर असतात... रॉकस्टारचं प्रमोशन करण्यासाठी रणबीर नुकताच पोहोचला जयपूरला.आणि त्याची एक झलक बघण्यासाठी हजारोंच्या संख्येने त्याच्या फॅन्सनी हजेरी लावली.

जयपूरच्या एका कॉलेजमध्ये रणबीर नुकताच पोहचला होता ते त्याच्या अपकमिंग रॉकस्टार फिल्मचं प्रमोशन करण्यासाठी... रणबीरने स्टेजवर पाऊल टाकताच एकच जल्लोष झाला... त्याची एक झलक बघण्यासाठी हजारोंच्या संख्येत त्याचे डायहार्ट फॅन्स इथे हजर होते... स्टेजवर रणबीर तर थिरकलाच... मात्र त्याचबरोबर इथे जमलेल्या रणबीरच्या फॅन्सनीही तेवढ्याच जोषात त्याच्याबरोबर ताल धरला...रणबीरने जेव्हा रॉकस्टारचे टीशर्ट चाहत्यांमध्ये भिरकवले... तेव्हा तर या गर्दीवर ताबा मिळवळं अशक्य झालं.. आणि त्यामुळे इथे पोलिसांनाही पाचारण करावं लागलं.

 

या गर्दीत कित्येकांना मारही लागला... मात्र रणबीरची एक झलक बघण्यासाठी त्याच्या फॅन्सनी मारही सहन केला. कारण रणबीरची जादूच तशी आहे. रणबीरसाठी काहीही करायला त्याचे फॅन्स हजर असतात. इथे रणबीरबरोबर स्टेजवर त्याची कोस्टार नर्गिसही हजर होती.मात्र रणबीरवरुन कुणाचीच नजर नर्गिसवर काही गेली नाही, इतकी रणबीरची त्याच्या फॅन्समध्ये क्रेझ आहे .