प्रीतीने सेलिब्रेट केला ३६वा वाढदिवस

प्रीती झिंटाने नुकताच आपला ३६ वा वाढदिवस सेलिब्रेट केला. प्रीतीच्या फॅन्ससह बॉलिवूडकरांनीही प्रीतीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. प्रीती सध्या परदेशी आपल्या होम प्रोडक्शनच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.

Updated: Feb 2, 2012, 08:19 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

प्रीती झिंटाने नुकताच आपला ३६ वा वाढदिवस सेलिब्रेट केला. प्रीतीच्या फॅन्ससह बॉलिवूडकरांनीही प्रीतीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. प्रीती सध्या परदेशी आपल्या होम प्रोडक्शनच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. ‘इश्क इन पॅरीस’ या सिनेमाचं शूटिंग सध्या प्रीती करत आहे. वाढदिवशी आपल्या होम प्रोडक्शचं शूटिंग करणं यासारखा दुसरा आनंद नाही आणि हा सिनेमा जर हिट झाला तर हे आपल्यासाठी वाढदिवसाचं सर्वात मोठ गिफ्ट असेल असं प्रीतीने स्पष्ट केलंय...