बिग बी मेकअपमनच्या सिनेमात भूमिका करणार

बिग बी आणि जया बच्चन हे त्यांचा मेकअप मॅन दीपक सावंतच्या भोजपुरी सिनेमा गंगादेवी काम करणार आहेत

Updated: Feb 8, 2012, 03:40 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

बिग बी आणि जया बच्चन हे त्यांचा मेकअपमन दीपक सावंतच्या भोजपुरी सिनेमा गंगादेवी काम करणार आहेत. अमितभ बच्चनने आपला ब्लॉग बिगबी.बिगअड्डा.कॉम (blog bigb.bigadda.com)वर लिहिलं आहे की मी आणि जया उद्या माझा मेकअपमन दीपक सावंत निर्मित 'गंगादेवी' सिनेमात काम करणार आहोत.

 

दीपक माझ्या बरोबर गेली ३५ वर्षे काम करत आहे आणि आजवर एकही दिवस त्याने  शुटिंग चुकवलेले नाही. त्याने बीआर फिल्मच्या सिनेमात माझ्या बरोबर काम करण्यास सुरवात केली आणि तेंव्हा पासून तो माझ्या सोबत आहे. मी एवढी छोटी गोष्टी त्याच्यासाठी करु शकतो. याआधी अमिताभ बच्चन यांनी सावंत यांच्या २००६ सालच्या गंगा या भोजपुरी सिनेमात काम केलं आहे. या सिनेमातुन गुलशन ग्रोव्हर भोजपुरी सिनेमात पदार्पण करणार आहे.