लडाखमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या लडाखमध्ये लवकरच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सजरा होणार आहे. जगातील सगळ्यात उंचीवर बांधलेल्या रस्त्यांमध्ये लडाखच्या रस्त्याचा समावेश होतो.

Updated: Mar 9, 2012, 11:01 AM IST

www.24taas.com, लडाख

 

आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या लडाखमध्ये लवकरच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सजरा होणार आहे. जगातील सगळ्यात उंचीवर बांधलेल्या रस्त्यांमध्ये लडाखच्या रस्त्याचा समावेश होतो. अशा दुर्गम भागामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणं, ही एक महत्त्वाची बाब आहे.

 

लडाख आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १५ जूनपासून सुरू होत आहे. हा महोत्सव ३ दिवस चालणार आहे. लडाख हे समुद्रसपाटीपासून १३,५०० फुट उंचीवर स्थित असल्यामुळे इथे होणारा हा चित्रपट महोत्सव हा जगातील सर्वांत उंच ठिकाणी आयोजित केलेला महोत्सव ठरणार आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल या महोत्सवाचे अध्यक्ष असतील.

 

लडाख आंतरराष्ट्रीय महोत्सवाचं पहिलंच वर्ष असूनही यासाठी आंतरराष्ट्रीय तसेच भारतीय निर्मात्यांनी दाखवलेला उत्साह पाहून खूप आनंद होतोय. यातून असं लक्षात येतं, की सिनेमांच्या स्क्रीनिंगसाठी हा महोत्सव किती महत्त्वाचा आहे. असं बेनेगल यांनी यासंदर्भात बोलताना सांगितलं.