सचिनपेक्षा खूप मोठा सलमान - केआरके

उथळ वागणं आणि वायफळ बडबड यामुळे सोशल नेटवर्कींग साइटवर फेमस झालेला केआरके म्हणजे कमाल आर खान याने आता पुन्हा एका मुक्ताफळे उधळली आहेत. हे महाशय म्हणत आहेत की सलमान खान हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपेक्षा खूप मोठा आहे.

Updated: Mar 27, 2012, 06:54 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

उथळ वागणं आणि वायफळ बडबड यामुळे सोशल नेटवर्कींग साइटवर फेमस झालेला केआरके म्हणजे कमाल आर खान याने आता पुन्हा एका मुक्ताफळे उधळली आहेत. हे महाशय म्हणत आहेत की सलमान खान हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपेक्षा खूप मोठा आहे. त्यांच्या या वायफळ बडबडीमुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे.

 

केआरके कोणाविषयी आपले मत व्यक्त करण्यात अग्रस्थानी असतो. त्याने पूनम पांडे ते असिन आणि आता सलमान खान ते सचिन असा वायफळ बडबडीचा मोर्चा वळविला आहे.

 

 

सचिन तेंडुलकर याच्या महाशतकानिमित्त मुकेश अंबानी यांनी एका जंगी पार्टीचे आयोजन केले होते.  सचिनचे अभिनंदन करण्यासाठी सलमान खानही या पार्टीला उपस्थित होता. त्या बद्दल या बाबाने आश्चर्य व्यक्त केले आहे.

 

 

केआरकेने केलेल्या टीवटीवमध्ये म्हटले की, सलमान महाशतक साजरे करण्यासाठी गेला होता. तो अंबानींसाठी गेला की सचिनसाठी गेला ? सचिन आणि सलमान हे एकमेकांना ओळखत नाही अशी पुडीही त्याने या ट्विटमध्ये सोडली आहे. काही वर्षापूर्वी सचिन आणि सलमान कोलंबो येथील एका जीममध्ये वर्कआऊट करीत होते. सलमान आणि सचिन स्वतःला एकमेकांपेक्षा मोठे समजतात. त्यामुळे त्यावेळी त्यांनी एकमेकांना ओळख दाखविली नाही.

 

 

माझ्यामते, सलमान हा सचिन पेक्षा खूप मोठा आहे, त्यामुळे सचिनने सलमानकडे जाऊन ओळख दाखवायला हवी होती, असा ‘शहाणपणा’ केआरकेने आपल्या ट्विटमध्ये केला आहे. सचिन जोपर्यंत मुंबई इंडियन्सचा कॅप्टन आहे तोपर्यंत मुंबई इंडियन्स आयपीएलचा खिताब जिंकू शकत नाही, असेही मुक्ताफळे या बाबाने उधळली आहेत.