सलमानला राजेश खन्नांची भेट नाकारली

बुजुर्ग अभिनेते राजेश खन्ना सध्या अस्वस्थ असल्यामुळे लीलावती हॉस्पिटलमध्ये भरती आहेत. तिथे त्यांना भेटण्यासाठी आलेल्या सलमान खानला लीलावती हॉस्पिटलने परवानगी नाकारली.

Updated: Jun 30, 2012, 11:31 PM IST

www.24taas.com, मुंबई

बुजुर्ग अभिनेते राजेश खन्ना सध्या अस्वस्थ असल्यामुळे लीलावती हॉस्पिटलमध्ये भरती आहेत. तिथे त्यांना भेटण्यासाठी आलेल्या सलमान खानला लीलावती हॉस्पिटलने परवानगी नाकारली.

सेटवर वेळेचं भान न बाळगता आपल्या मर्जीप्रमाणे येणारा-जाणारा अभिनेता म्हणून सलमान खान ओळखला जातो. राजेश खन्ना यांना भेटायलाही सलमान खान आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे अवेळी हॉस्पिटलमध्ये आला. मात्र, लीलावती हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटने सलमान खानला राजेश खन्नांची भेट नाकारली.

ह़ॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या भेटीचे तास ठरलेले असतात. लीलावती हॉस्पिटलमध्ये या संदर्भात काटेकोर नियम आहेत. सलमान खान मात्र व्हिजिटिंग अवर्स न पाळता आल्यामुळे त्याला लीलावती हॉस्पिटलने राजेश खन्नांच्या भेटीची परवानगी नाकारली. सलमान खानच्या स्टार स्टेटसपुढे दबून न जाता लीलावती हॉस्पिटलने सलमान खानला बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे सलमान खान राजेश खन्ना यांना न भेटताच निराश होऊन परतला.