झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी अखेर वाढवण्यात आला आहे. लोकपाल बिलाच्या मंजुरीसाठी हा कालावधी वाढवण्यात आला आहे. २७ ते २९ डिसेंबरपर्यंत अधिवेशन लांबले आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनचा कालावधी तीन दिवसांसाठी वाढवण्यात आला आहे. लोकपाल विधेयकासाठी २७ ते २९ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे लोकपाल विधेयक यंदाच्या हिवाळी अधिवेशनातच मंजूर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
२४ डिसेंबर आणि २५ डिसेंबर या तारखांच्या सुट्टीनंतर आता २७ ते २९ डिसेंबरपर्यंत अधिवेशन चालणार आहे. त्यामुळे लोकपाल विधेयक या अधिवेशनात मंजूर होण्याची शक्यता आहे.