अण्णांच्या सहकाऱ्यांचं स्टिंग ऑपरेशन; पैसा येतो कुठून?

एका बाजुला टीम अण्णांच्या जंतर मंतरवर होत असलेल्या आंदोलनामुळं देशातलं वातावरण ढवळून निघण्याची चिन्ह असतानाच दुसऱ्या बाजुला ‘द वीक’ या इंग्रजी साप्ताहिकानं केलेल्या एका स्टींग ऑपरेशनमुळं खळबळ उडालीय. अण्णांच्या आंदोलनाला येणारा पैसा हा नेमका कुठल्या मार्गाने येतो, याची माहिती अण्णांच्या सहकाऱ्यांनी स्टींग ऑपरेशनमध्ये केल्याचा दावा ‘द वीक’ने केलाय.

Updated: Jul 25, 2012, 07:57 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

एका बाजुला टीम अण्णांच्या जंतर मंतरवर होत असलेल्या आंदोलनामुळं देशातलं वातावरण ढवळून निघण्याची चिन्ह असतानाच दुसऱ्या बाजुला ‘द वीक’ या इंग्रजी साप्ताहिकानं केलेल्या एका स्टींग ऑपरेशनमुळं खळबळ उडालीय. अण्णांच्या आंदोलनाला येणारा पैसा हा नेमका कुठल्या मार्गाने येतो, याची माहिती अण्णांच्या सहकाऱ्यांनी स्टींग ऑपरेशनमध्ये केल्याचा दावा ‘द वीक’ने केलाय. तर ही सीडी बनावट असल्याचा प्रतिदावा अण्णा हजारे आणि पठारे यांनी केलाय.

 

जनलोकपाल आणि भ्रष्टाचाराच्या मुद्यावर टीम अण्णांनी केलेली आंदोलनं त्यातल्या गंभीर मुद्यांबरोबरच लक्षात राहिली ती आंदोलनाच्या भव्यतेमुळे. ही आंदोलनं चालवण्यासाठी पैसा कुठून येतो, हा प्रश्न अण्णा हजारेंच्या विरोधकांनी वारंवार उपस्थित केला. या प्रश्नाचं उत्तर शोधल्याचा दावा ‘द वीक’ या इंग्रजी साप्ताहिकानं स्टींग ऑपरेशनच्या माध्यमातून केलाय.

 

या स्टिंग ऑपरेशनमध्ये सुरेश पठारे यांनी याबद्दल खुलासा केलाय. यामध्ये हवाल्यामार्फत आंदोलनाला पैसे मिळाल्याचं सुरेश पठारे यांनी म्हटलंय. तर किरण बेदी आणि केजरीवालही आंदोलनासाठी मिळालेल्या पैशांमध्ये भ्रष्टाचार करत असल्याचं अण्णांच्या इतर काही सहकाऱ्यांनी म्हटलंय. इतकंच नव्हे तर या आंदोलनाचे केंद्रस्थान असलेले अण्णाच या भ्रष्टाचाराला खतपाणी घातल असल्याचं अण्णांच्या सहकाऱ्यांनी म्हटलेलं या सीडीमध्ये दिसून येतंय.

 

'द वीक'च्या या स्टींग ऑपरेशननंतर स्वतः अण्णा हजारे यांनीही ही सीडी पूर्णपणे बनावट असल्याचा दावा करत सर्व आरोप फेटाळून लावलेत. अण्णा हजारेंच्या म्हणण्यानुसार या सीडीच्या खरे-खोटेपणाचा जरुर तपास व्हायला हवा. तसंच त्यातल्या आरोपांचीही पारदर्शक चौकशी व्हावी. जेणेकरुन ऐन आंदोलनाच्या तोंडावर जमा झालेलं संशयाचं मळभ दूर व्हायला मदत होईल.

 

काय आहे स्टींग ऑपरेशनमध्ये - 

[jwplayer mediaid="145317"]

 

.