उत्तराखंडमध्ये भाजप-काँग्रेसमध्ये सत्तेसाठी रस्सीखेच

उत्तराखंडमध्ये सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेस यांच्यात बहुमत मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच चालू आहे. सध्या उपलब्ध असलेल्या मतमोजणीच्या आकडेवारीनुसार भाजप ३२ तर काँग्रेस ३१ जागांवर आघाडीवर आहे.

Updated: Mar 6, 2012, 03:03 PM IST

www.24taas.com, डेहराडून

 

उत्तराखंडमध्ये सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेस यांच्यात बहुमत मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच चालू आहे. सध्या उपलब्ध असलेल्या मतमोजणीच्या आकडेवारीनुसार भाजप ३२ तर काँग्रेस ३१ जागांवर आघाडीवर आहे. बसपा तीन तर इतर चार जागांवर पुढे आहेत.

 

उत्तराखंडमध्ये विधानसभेचा पहिला कौल भाजपाच्या बाजुने लागला. सितारगंज विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार किरणचंद मंडल यांनी बसपाच्या उमेदवाराचा पराभव केला. कोटद्वारमध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री बी.सी.खंडूरी हे काँग्रेसच्या एस.एस.नेगींपेक्षा पिछाडीवर होते.

 

उत्तराखंड विधानसभेच्या ७० जागांसाठीच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस यांनी सर्व जागा लढवल्या होत्या. बसपानेही सर्व जागांवर उमेदवार उभे केले होते तर उत्तराखंड क्रांती दलाने ५२ जागा लढवल्या. मागच्या विधानसभेत भाजपचे ३६ तर काँग्रेसचे २०, बसपाचे ८ तर उत्तराखंड क्रांती दलाचे ३ आणि अपक्ष ३ सदस्य असे बलाबल होते.

 

विधानसभेसाठी ३० जानेवारी रोजी झालेल्या निवडणुकीत ७० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. निवडणुकीच्या आधी भाजपने मुख्यमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांना बदलून त्यांच्या जागी बी.सी.खंडूरी यांना बसवले होतं पण वेळ कमी मिळाल्याने त्यांना सत्ता राखण्याचं आव्हान पेलता आलं नाही.