www.24taas.com, पणजी
वाढत्या तापमानामुळे माणसाबरोबर प्राणीही अस्वस्थ होऊ लागले आहेत. गोव्यात एका आठवड्यात दोन किंग कोब्रा जातीचे नाग मनुष्यवस्तीजवळ आढळले आहेत. त्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तब्बल १३ फूट लांबीचे हे नाग होते.
जैव विविधतेनं समुद्ध असणाऱ्या सह्याद्री अर्थात पश्चिम घाटाचा मधला भाग गोव्यात येतो. यात पानगळीबरोबर सदाहरीत दमट जंगलाचा भागही येतो. किंग कोब्रा सारख्या सापांचा हा अधिवास आहे. गोव्यातल्या सत्तरी, सांगे आणि काणकोण भागातल्या जंगलामध्ये किंग कोब्राचा वावर आहे.
वाढत्या तापमानामुळं सापासारखे प्राणी अस्वस्थ होतात. त्याचा प्रत्यय गोव्यात येतोय. अॅनीमल रेस्क्यू स्कॉडनं हिवरे आणि ठाणे येथून या नागांना पकडलंय. त्यात पूर्ण वाढ झालेली नागांची मादी होती. त्यांना म्हादई अभयारण्यात सोडण्यात आलं. किंग कोब्रांचं विष अत्यंत जहाल असतं.