एनडीएने दिली जसवंत सिंग यांना उमेदवारी

एनडीएने देशाच्या उपराष्‍ट्रपतीपदाच्‍या निवडणुकीसाठी नेते जसवंत सिंग यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. भाजपचे ज्‍येष्‍ठ नेते लालकृष्‍ण अडवाणी यांनी ही घोषणा केली आहे.

Updated: Jul 16, 2012, 12:39 PM IST

www.24taas.com, नवी दिल्‍ली

एनडीएने  देशाच्या उपराष्‍ट्रपतीपदाच्‍या निवडणुकीसाठी  नेते जसवंत सिंग यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. भाजपचे ज्‍येष्‍ठ नेते लालकृष्‍ण अडवाणी यांनी ही घोषणा केली आहे.

उपराष्‍ट्रपतीपदाचा उमेदवार निवडण्‍यासाठी आज सकाळी एनडीएच्‍या घटक पक्षांची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्‍यात आला. संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांनी ही निवडणूक लढवावी, अशी भाजपची इच्‍छा होती. परंतु, ते इच्‍छुक नव्‍हते, असे अडवाणी यांनी सांगितले.

राष्ट्रपतिपदासाठी युपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा देणार्‍या जनता दल (संयुक्त) आणि शिवसेनेने  मात्र उपराष्ट्रपतिपदासाठी एनडीएत राहण्याचा निर्णय घेतला. उपराष्ट्रपतिपदासाठी भाजप नेते जसवंत सिंग आणि राज्यसभेच्या माजी उपसभापती नजमा हेपतुल्ला यांच्‍या नावाची चर्चा होती. परंतु, अखेर जसवंत सिंग यांना उमेदवारी देण्‍यात आली.