धनादेश (चेक) आणि ड्राफ्टच्या वैधतेची मुदत सहा महिन्यांवरुन तीन महिन्यांपर्यंत कमी करण्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेने जाहीर केलं.
ग्राहकांना पुढील वर्षी १ एप्रिल पासून चेक आणि ड्राफ्ट तीन महिन्यांच्या आत बँकेत जमा करावे लागतील. रिझर्व्ह बँकेने वैधतेची मुदत कमी करण्याचे कारण पत्रकात दिलं आहे. चेक आणि ड्राफ्टची वैध सहा महिने असल्यामुळे लोक त्याचा गैर फायदा घेत असल्याचं म्हटलं आहे. मार्केटमध्ये रोकडप्रमाणे चेक आणि ड्राफ्ट चलन म्हणून वापरण्यात येत असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलं. ग्राहकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी यासराठी बँकांना १ एप्रिल २०१२ पासून चेक आणि ड्राफ्टवर हा बदल छापण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.