दिल्लीत थंडीने सर्वांनाच गारटविले असताना आता धुक्याने लपटले आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर दिल्लीमध्ये आज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात धुके पसरले होते. या धुक्याने रस्ता, रेल्वे आणि विमानसेवा विस्कळीत झाली आहे. याचा परिणाम प्रवाशांना बसला आहे.
धुक्यामुळे विमानसेवेबरोबरच महामार्गावरील वाहतूकही संथगतीने सुरु आहे. तसेच रेल्वेही उशीराने धावत आहेत. दिल्लीतून सुटणाऱ्या २६ गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. तर धुक्याने हवाईसेवेला बेजार केले आहे.
हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार वातावरणात बदल होणे अशक्य आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत नेहमीप्रमाणे वातावरण होईल, असे स्पष्ट केले होते. परंतु स्थिती कायम होती. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर धुक्यामुळे ५० मीटर अंतरावरील काही दिसत नव्हते. त्यामुळे चार विमानांच्या उड्डाणामध्ये उशीर झाला. त्यामध्ये तीन परदेशात जाणाऱ्या विमानांचा समावेश होता. विमानसेवा विस्कळीत झाल्याने याचा परिणाम प्रवाशांना बसला आहे.