www.24taas.com, नवी दिल्ली
फेसबुकची मोहिनी ही तर साऱ्या जगावरच आहे. तर त्याला भारत तरी कसा अपवाद ठरू शकतो. अगदी लष्कारातील अधिकारीही याला अपवाद ठरू शकत नाही. भारतीय लष्करातील एका अधिकार्याने 'फेसबुक'च्या माध्यमातून एका बांगलादेशी महिलेशी संबंध प्रस्थापित केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ले. कर्नल संजय शांडिल्य असे या लष्कर अधिकार्याचे नाव आहे. सध्या या अधिकाऱ्यांविरोधात चौकशी सुरू आहे. या लष्करी अधिकाऱ्यांने शीबा नामक महिलेने गेल्या वर्षी आपल्या जाळ्यात अडकवले होते. शीबा ही बांगलादेशी आहे, ती पाकिस्तानी दहशतवादी संस्था आयएसआयची एजंट आहे. कर्नल यांनी शीबाला लष्कराची महत्त्वाची माहिती दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
हे प्रकरण मे महिन्यात उघडकीस आले होते. आर्मी इंटेलिजेंसने कर्नल शांडिल्य यांच्यावर संशय व्यक्त केल्याने या प्रकरणाबाबत रॉ आणि आयबी यांना कळवण्यात आले आहे. काही वृत्तवाहिन्यांनी बुधवारी कर्नल शांडिल्य आणि शीबाला अटक झाल्याचे वृत्त प्रसारीत केले होते. परंतु हे वृत्त लष्कराने फेटाळून लावले आहे.