मणिपुरात हिंसाचार, ५ ठार

मणिपूर विधानसभा निवडणुकीत मतदानादरम्यान हिंसाचारात वाढ झाली आहे. या हिंसाचारात पाच जण ठार आणि अनेक जखमी झाल्याचे वृत्त आहे.

Updated: Jan 28, 2012, 03:44 PM IST

www.24taas.com, इंफाळ

मणिपूर विधानसभा निवडणुकीत मतदानादरम्यान हिंसाचारात वाढ झाली आहे. या   हिंसाचारात  पाच जण ठार आणि अनेक जखमी झाल्याचे वृत्त आहे.

चंडेल जिल्ह्यात मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न  कार्यकर्त्यांनी केला. यावेळी निमलष्करी दलाच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात तीन नागरिकांसह पाच जण ठार झाले. यात निमलष्करी दलाच्या एका जवानाचाही समावेश आहे.  लष्करांने केलेल्या गोळीबाराच्यावेळी तीन जवान जखमी झाले.