संसदेत तीन महत्वाच्या विधेयकांना मंजुरी

अन्न सुरक्षा विधेयकाबाबत आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही. आता पुढच्या आठवड्यात पुन्हा या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र या बैठकीत तीन महत्त्वाच्या विधेयकांना मंजुरी देण्यात आली. सिटीझन चार्टर, व्हिसल बोअर प्रोटेक्शन आणि न्यायिक उत्तरदायित्व बिलाला मंजुरी देण्यात आली

Updated: Dec 13, 2011, 05:28 PM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

अन्न सुरक्षा विधेयकाबाबत आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही. आता पुढच्या आठवड्यात पुन्हा या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र या बैठकीत तीन महत्त्वाच्या विधेयकांना मंजुरी देण्यात आली. सिटीझन चार्टर, व्हिसल बोअर प्रोटेक्शन आणि न्यायिक उत्तरदायित्व बिलाला मंजुरी देण्यात आली. आता भ्रष्टाचारविरोधी लढ्यासाठी ही तिन्ही बिलं लवकरच संसदेत मांडण्यात येतील.

 

मात्र अन्न सुरक्षा बिलाबाबत सहमती न झाल्यानं, याबाबतचा अंतिम निर्णय बैठकीत होऊ शकला नाही,  मात्र हे बिल या अधिवेशनात मांडण्यासाठी पूर्ण प्रयत्न करु, असं आश्वासन केंद्रीय अन्न आणि पुरवठामंत्री के. व्ही. थ़ॉमस यांनी दिलय. या बिलाबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी पंतप्रधान सर्व मंत्र्य़ांशी चर्चा करणार आहेत. आता १८ डिसेंबरला होणा-या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

 

अन्न सुरक्षा विधेयकाबाबत आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही. आता पुढच्या आठवड्यात पुन्हा या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र या बैठकीत तीन महत्त्वाच्या विधेयकांना मंजुरी देण्यात आली. य़ाच सिटीझन चार्टर, व्हिसल बोअर प्रोटेक्शन आणि न्यायिक उत्तरदायित्व बिलाला मंजुरी देण्यात आली. आता भ्रष्टाचारविरोधी लढ्यासाठी ही तिन्ही बिलं लवकरच
संसदेत मांडण्यात येतील. मात्र अन्न सुरक्षा बिलाबाबत सहमती न झाल्यानं, याबाबतचा अंतिम निर्णय बैठकीत होऊ शकला नाही, मात्र हे बिल या अधिवेशनात मांडण्यासाठी पूर्ण प्रयत्न करु, असं आश्वासन केंद्रीय अन्न आणि पुरवठामंत्री के. व्ही. थ़ॉमस यांनी दिलय. या बिलाबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी पंतप्रधान सर्व मंत्र्य़ांशी चर्चा करणार आहेत. आता १८ डिसेंबरला होणा-या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.