स्पेक्ट्रम घोटाळा : राजाला आज जामीन?

टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपी आणि माजी दूरसंचार मंत्री ए राजा यांनी जामीनासाठी अर्ज केलाय. या अर्जावर आज सीबीआयच्या विशेष कोर्टात निर्णय होण्याची शक्यता आहे.

Updated: May 11, 2012, 11:25 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपी आणि माजी दूरसंचार मंत्री ए राजा यांनी जामीनासाठी अर्ज केलाय. या अर्जावर आज सीबीआयच्या विशेष कोर्टात निर्णय होण्याची शक्यता आहे.

 

गेल्या १५ महिन्यांपासून कारागृहात असलेल्या ए राजा यांनी अन्य आरोपींना मिळालेल्या जामीनाच्या आधारावर आपल्यालाही जामीन मिळावा, यासाठी अन्य केला आहे. सीबीआयचे विशेष न्यायाधीश ओ. पी. सैनी यांनी राजा यांच्या अर्जावर सीबीआयला विचारणा केली आहे.

 

देशातल्या सर्वात गाजलेल्या घोटाळ्यातील इतर आरोपी संजय चंद्रा, स्वॉन टेलिकॉम प्रमोटर विनोद गोएंका, रिलायन्स अनिल धीरुभाई अंबानी ग्रुपचे गौतम दोषी, सुरेंद्र पिपारा, हरि नायर, डीएमकेच्या खासदार कनिमोळी, कलाइनार टीव्हीचे तत्कालीन एमडी शरद कुमार, फिल्म निर्माता करीम मोरानी, आसिफ बलवा, राजीव अग्रवाल, शाहिद उस्मान बलवा यांना यापूर्वीच जामीन मिळाला आहे. त्यामुळे आज ए राजांनाही जामीन मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.