LIVE UPDATES-पाच राज्यांतील मतमोजणी

Updated: Mar 6, 2012, 02:50 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

युपी आणि गोव्यात सत्ता परिर्वतन होण्याची शक्यता आहे. पाच राज्यातील मतमोजणीतील सुरूवातील आलेल्या ट्रेंडनुसार उत्तरप्रदेशात सप आता दीड शतकाकडे वाटचाल करीत आहे. तर उत्तराखंडमध्ये काँग्रेसने २९ जागांवर आघाडी घेतली आहे. पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलाने ५२ जागांवर तर मणीपूरमध्ये काँग्रेस १३ जागांवर आघाडीवर आहे.

 

 

 

 

 

पाच राज्यातील निवडणूक निकालांचे हायलाइट्स

.

.

उत्तर प्रदेश

 

मुलायम सिंग मुख्यमंत्री बनणार- शिवपाल

पीस पार्टीचा सपला पाठींबा

सपची १९६ जागांवर आघाडी. २००कडे वाटचाल

अनेक विद्यमान मंत्री पराभूत

निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत मायावती थोड्याच वेळात राजीनामा देण्याची शक्यता

उत्तर प्रदेशमध्ये सत्तापालट

भाजपची चौथ्या स्थानावर घसरण.

बसपाच्या पीछेहाटीमुळे सन्नाटा

मायावतींच्या निवासस्थानी शुकशुकाट

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आघाडीवर

बहुजन समाजवादी पक्ष दुसऱ्या स्थानावर

भाजप तिसऱ्या स्थानावर

काँग्रेस चौथ्या स्थानावर

 

पंजाब

अकाली दल- भाजपला ११७ पैका ६७ जागा

पंजाबमध्ये काँग्रेसचं जोरदार कमबॅक

माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग विजयी

काँग्रेस- अकाली दलात चुरस

अकाली दलाची सत्ता कायम

अकाली दल- भाजपला पूर्णबहुमत

पंजाबमधील ११७ जागांचे कल हाती.

पंजाबमध्ये काँग्रेसचं स्वप्न धुळीला मिळणार.

सलग दुसऱ्यांदा अकाली दलाची सत्ता कायम राहाण्याची चिन्हं.

मुख्य़मंत्री प्रकाशसिंग बादल आघाडीवर

 

गोवा

 

गोव्यात आणखी ७ जागांवर भाजपची आघाडी

१५ जागा पटकावत भाजप आघाडीवर

काँग्रेसला  आत्तापर्यंत फक्त २ जागा 

मगोपबरोबरच्या युतीचा भाजपला फायदा

गोव्यात भाजपची मुसंडी.

 

उत्तराखंड

 ३०-३० जागांमध्ये आघाडी

निकालानंतर भाजपमधील मतभेद उघड

भाजपची रणनिती चुकली. भाजप नेते पोखरियाल यांची कबुली 

छोटे पक्षच ठरणार किंगमेकर

उत्तराखंडामध्ये सत्तापालट

भाजपला मोठा फटका

काँग्रेस ३६ जागांवर आघाडीवर

उत्तराखंडात सत्तापालट नक्की

उत्तराखंडमध्ये उत्कंठावर्धक निकाल

काँग्रेसलाही सत्तास्थापनेची मोठी संधी

उत्तराखंडमध्ये त्रिशंकू विधानसभेची शक्यता 

छोटे पक्ष आणि बसप ठरणार किंगमेकर