'डॉ. मुंडेवरील खटले जिल्ह्याच्या बाहेर हवे'

Updated: Jun 1, 2012, 11:26 AM IST

www.24taas.com, परळी

 

परळीतल्या डॉ. सुदाम मुंडेवरील खटले बीड जिल्ह्याच्या बाहेर चालवण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केली आहे. डॉ. सुदाम मुंडेला राजकीय पाठबळ असल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे.

 

डॉ. सुदाम मुंडेला राजकीय पाठबळ असल्याचा अनेक वर्षांपासून दावा करणा-या सामाजिक कार्यकर्त्यांच्या म्हणण्याला बळ प्राप्त झालंय. तसंच आता या प्रकरणात राजकीय दबाव झुगारून पोलीस कारवाई करणार का हे आता लवकरच स्पष्ट होईल.

 

संबंधित आणखी बातम्या

 

डॉ. सुदाम मुंडेनी दिली पोलिसांनी तुरी

परळीतल्या स्त्री गर्भपात हत्येप्रकरणी फरार असलेला डॉक्टर सुदाम मुंडे आणि त्यांची पत्नी अद्यापही पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी ठरले आहेत. गृहमंत्री आर.आर.पाटलांनी मात्र पोलीस लवकरच मुंडेंना अटक करतील असा दावा केलाय. तर दुसरीकडं गोपीनाथ मुंडेंनीही डॉक्टर मुंडेंवर कारवाईची मागणी केली आहे.
---------------------------------------

डॉ. मुंडेचा ‘तो’ जामीन रद्द

परळी बीड संशयित भ्रूण हत्या प्रकरणातील आरोपी डॉ. सुदाम मुंडे याला आंबेजोगाई सेशन कोर्टानं आणखी एक दणका दिलाय. २०१० साली झालेल्या गर्भपात प्रकरणात महिलेच्या मृत्यूप्रकरणी डॉ. मुंडेला दिलेला जामीन रद्द करण्यात आलाय.
---------------------------------------