प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन, जेएनपीटी होणार ठप्प

२७ वर्षांपासून जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांच्या साडेबारा टक्के भूखंडाच्या मागण्या मान्य होत नसल्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी बंदचं हत्यार उपसले आहे. प्रकल्पग्रस्तांनी २७मार्चपासून बेमुदत बंदची हाक दिली आहे. या बंदमुळे जेएनपीटी बंदर कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Updated: Mar 22, 2012, 08:49 AM IST

www.24taas.com, नवी मुंबई

२७ वर्षांपासून जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांच्या साडेबारा टक्के भूखंडाच्या मागण्या मान्य होत नसल्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी बंदचं हत्यार उपसले आहे.  प्रकल्पग्रस्तांनी २७मार्चपासून बेमुदत बंदची हाक दिली आहे. या  बंदमुळे जेएनपीटी बंदर कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

नवी मुंबईतील जेएनपीटी बंदराच्या उभारणीसाठी उरण परिसरातील १८ गावांमधील जमीन संपादीत करण्यात आली होती. २७ वर्षांनंतरही इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या साडेबारा टक्के भूखंडाबाबत निर्णय घेण्यात येत नसल्यानं मागील वर्षी २३मार्चला जेएनपीटी बंदची घोषणा करण्यात आली होती. यावेळी नौकानयन मंत्र्यांसह झालेल्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांना भूखंड देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु केंद्राकडून याबाबत कसलाही निर्णय होत नसल्यामुळे हे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्पग्रस्तांनी दिली आहे.

२७ मार्चपासून करण्यात येणा-या बंदमुळे जेएनपीटी बंदराचं कामकाज ठप्प राहणारेए. जवळपास पाच हजार कामगार बंदमध्ये सहभागी होणारेत. २७ मार्चपासून प्रकल्पग्रस्तांनी संप केल्यास जेएनपीटीमध्ये कोट्यवधींचं नुकसान होईल. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या मागण्याबाबत प्राधान्याने विचार करण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.