www.24taas.com, नवी मुंबई
नवी मुंबईत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उभारल्यानं फेरीवाल्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून आपला निषेध नोंदवला. फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना फुटपाथवरून चालणेही मुश्कील झाले आहे. रस्त्याच्या बाजुलाच दुकान थाटल्याने याचा त्रासही वाहनचालकांना होतो. त्यामुळे फेरीवाल्यांना हटविण्याची मागणी करण्यात आली होती.
गेल्या १५ दिवसांपासून फेरीवाल्यांवर अतिक्रमणाची कारवाई सुरू केली आहे. यामध्ये परवानाधारक फेरीवाल्यांवर कारवाई करत असल्यानं ही कारवाई थांबविण्यासाठी फेरीवाल्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. महापालिकेनं हक्काची जागा द्यावी या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. फेरीवाल्यांसाठी सिडकोनं ४३ भूखंड दिलेत. परंतु त्यातील ३२ भूखंड तसंच पडून आहेत. त्यामुळे महापालिका या फेरीवाल्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप काँग्रेसतर्फे करण्यात आले. या मोर्चात नवी मुंबईतील फेरीवाले मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.
मोर्चा काढण्यासाठी काँग्रेस पुढाकार घेऊन राजकारण केल्याचा आरोप होत आहे. फेरीवाल्यांचा काँग्रेसला पुळका आला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढल्याने कारवाईचा बढगा उचल्याने स्वागत करण्यात येत आहे. मात्र, ही कारवाई रोखण्याठी काँग्रेसने नाक खुपसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
व्हिडिओ पाहा...
[jwplayer mediaid="70113"]