राज आदेशानंतर ठाण्यातही खळ्ळखट्याक

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या टोलविरोधातल्या आदेशाचे पडसाद ठाण्यातही उमटले. ठाण्यात घोडबंदर नाक्यावर मनसैनिकांनी आंदोलन करत, टोलनाका बंद केला.. तर आनंदनगर टोलनाक्याच्या मॅनेजरला मनसैनिकांनी घेराव घातला होता.

Updated: Jun 14, 2012, 10:33 AM IST

www.24taas.com, मुंबई/ठाणे

 

मनसे अध्यक्ष  राज ठाकरेंच्या टोलविरोधातल्या आदेशाचे पडसाद ठाण्यातही उमटले. ठाण्यात घोडबंदर नाक्यावर मनसैनिकांनी आंदोलन करत, टोलनाका बंद केला.. तर आनंदनगर टोलनाक्याच्या मॅनेजरला मनसैनिकांनी घेराव घातला होता.

 

दोन दिवसांत इंडिकेटर लावले नाही, तर मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. मनसेच्या या आंदोलनानंतर आनंदनगर आणि ऐरोली टोलनाक्यावर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलीय.

 

ठाण्यातून मुंबईला जाताना टोल द्यावा लागतो आणि टोलची मूळ किंमत वसूल होऊन सुद्धा टोलनाक्यावर टोल वसूल केला जातो ही जनतेची लूट आहे, अशी प्रतिक्रिया उमटत  आहे.

 

राज ठाकरेंनी राज्यातल्या टोल नाक्यांविरोधात आंदोलन सुरु करण्याची घोषणा केलीय. मुंबईत प्लॉस्टिकमुक्ती राबवण्यापेक्षा टोलमुक्ती अभियान राबवा असं आवाहन त्यांनी सरकारला केलयं. दरम्यान, राज यांनी टोलविरोधात इशारा दिल्यानंतर मुंबईत दहिसरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली.

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज टोलविरोधात इशारा दिल्यानंतर मुंबईत दहिसरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली. मनसे आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या टोलनाक्यावर अवैधपणे टोलवसुली होत असल्याचा आरोप मनसैनिकांनी केलाय.

 

मनसैनिकांनी केलेल्या तोडफोडीनंतर दहिसर टोलनाक्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी मनसैनिकांवर लाठीनारही केला.. याप्रकरणी मनसेच्या  तीन नगरसेवकांसह काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलय.