सुहासिनी लोखंडेंना घातपात झाला असावा- एकनाथ शिंदे

बेपत्ता भाजप नगरसेविका सुहासिनी लोखंडे यांना घातपात झाल्याचा संशय ठाणे शिवसेना जिल्हा प्रमुख एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. सुहासिनी लोखंडेंना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांनी घातपात केल्याचं संशय एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी झी २४ तासशी बोलताना पोलिसांनी तपास जलदगतीने करावा अशी मागणी शिंदे यांनी केली

Updated: Mar 4, 2012, 02:40 PM IST

www.24taas.com, कपिल राऊत, ठाणे

 

बेपत्ता भाजप नगरसेविका सुहासिनी लोखंडे यांना घातपात झाल्याचा संशय ठाणे शिवसेना जिल्हा प्रमुख एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. सुहासिनी लोखंडेंना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांनी घातपात केल्याचं संशय एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी झी २४ तासशी बोलताना पोलिसांनी तपास जलदगतीने करावा अशी मागणी शिंदे यांनी केली. लोखंडेच्या बाबतीत भाजपची चूक असल्याचं मत शिंदे यांनी व्यक्त करताना भाजपच्या नेत्यांनी काळजी घेणं आवश्यक होतं असंही त्यांनी सांगितलं.

 

ठाण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवायची त्यासाठी त्यांनी खालची पातळी गाठली आहे अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी व्यक्त केली. लोखंडे यांची हत्या केली असावी असाही आमचा संशय असल्याचं संशय शिंदे यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीचे ठाण्यातल्या नेत्यांनी सत्तेचा गैरवापर, दुरुपयोग करत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीच सुहासिनी लोखंडे आणि त्यांच्या कुटुंबियांना गायब केल्याचा आरोपच शिंदे यांनी केला आहे. तसंच यानंतर पुकारलेलं आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आणि त्यांची जबाबदारी पोलीस आणि सरकारवर असेल असा इशाराही शिंदे यांनी दिला.

 

भाजप नगरसेविका सुहासिनी लोखंडे बेपत्ता झाल्याने ठाण्यात एकच खळबळ उडाली. शिवसेना –भाजपने काल लोखंडे बेपत्ता झाल्यानंतर बंद पुकारला त्याला मध्यरात्री हिंसक वळण लागलं.

 

[jwplayer mediaid="59631"]