Crime News In Marathi: दोन वर्षानंतर एका चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. खार पोलिसांनी एका महिलेवर दागिने चोरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संजना गुजर या महिलेवर 8 लाखांचे दागिने चोरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. इन्स्टाग्राम व्हिडिओमुळं या चोरीचा छडा लागला आहे. पोलिसांनी या महिलेला अटक केली की नाही हे मात्र अद्यार समजू शकलेले नाही.
चोरीचे दागिने घालून मोलकरणीने रिल इन्स्टाग्रामवर शेअर केलं होता. हाच व्हिडिओ तिच्या मालकिणीने बघितला. तेव्हा तिने लगेचच त्याचा स्क्रीनशॉट काढला आणि पोलिसांना माहिती दिली. खार पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन तिची चौकशी करण्यास सुरुवात केली होती. खार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 49 वर्षीय महिलेचे 8 लाखांचे दागिने चोरी झाल्याची तक्रार तिने दाखल केली होती. विशेष म्हणजे याच महिलेने तिचे दागिने परत मिळवण्यासाठी व केस सोडवण्यास पोलिसांची मदत केली.
महिलेने सोशल मीडियावर एक पोस्ट पाहिली. यात तिच्याच घरी एक आठवड्यासाठी काम करण्यासाठी आलेल्या मोलकरणीने तिचीच डायमंड रिंग घालून रील पोस्ट केली आहे. त्यानंतर महिलेने लगेचच पोलिसांत धाव घेतली आणि पोलिसांच्या हा प्रकार निदर्शनास आणून दिला. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेऊन चौकशीसाठी पोलिस ठाण्यात नेण्यात आलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खार परिसरात एका उच्चभ्रू वास्तुत राहणाऱ्या महिलेने एका तक्रार दाखल केली होती. दोन मुलांना संभाळण्यासाठी तिच्याकडे दोन महिला काम करतात. एक 7 वर्षांपासून काम करते तर एक मागील दोन वर्षांपासून तिच्याघरी काम करते. डिसेंबर 2022 मध्ये त्यातील एक महिला सुट्टीवर गेली होती. तेव्हा तिच्या जागी एका दुसऱ्या महिलेला कामावर ठेवण्यात आलं.
त्याचदरम्यान महिलेला पतीसोबत दुबईला कामानिमित्त जायचे होते. तेव्हाच तिच्याकडे काम करणारी जुनी मोलकरीण पुन्हा कामावर रुजू झाली. तर, नव्या मोलकरणीने कामावर येण्यास नकार दिला. महिलेने तक्रारीत म्हटलं आहे की, तिला एकेदिवशी पार्टीला जायचं होतं तेव्हा तिने कपाट उघडलं तर त्यातील दागिने चोरीला गेले होते. यात पाच सोन्याच्या अंगठ्या त्यातील एकात हिरा जडवला होता. या दागिन्यांची किंमत 7 लाख रुपये होती. एक कानातले रिंग ज्याची किंमत 1 लाख रुपये होती. म्हणजेच जवळपास 8 लाखांचे दागिने चोरीला गेले होते.
तक्रारदार महिलेने तिच्या तिन्ही मोलकरणींना दागिन्यांबाबत विचारलं तेव्हा त्यांनी कोणतीच माहिती नसल्याचे म्हटलं होतं. 10 सप्टेंबर रोजी जेव्हा तक्रारदार महिला सोशल मीडियावर काही व्हिडिओ बघत होती तेव्हा तिने पाहिले की तिची तिसरी मोलकरीणीने एक रिल पोस्ट केले होते. त्यात तिने तेच दागिने घातले होते जे चोरी झाले होते. तेव्हा तिने लगेचच स्क्रीनशॉट काढत पोलिसांत धाव घेतली.