काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांचा गोंधळ

महापालिका निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या रोषाचा फटका नेत्यांना बसला. एबी फॉर्मवरून महिला कार्यकर्त्या संतापल्या होत्या. त्याचा फटका सरचिटणीस आणि स्थानिक खासदार विलास मुत्तेमवारांना बसला.

Updated: Feb 4, 2012, 07:08 PM IST

www.24taas.com, नागपूर

 

महापालिका निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या रोषाचा फटका नेत्यांना बसला. एबी फॉर्मवरून महिला कार्यकर्त्या संतापल्या होत्या. त्याचा फटका सरचिटणीस आणि स्थानिक खासदार विलास मुत्तेमवारांना बसला.

 

नागपुरात महापालिका निवडणुकीत निरीक्षक रोहिदास पाटील यांना काँग्रेस कार्यकर्त्यांच्या रोषाचा असा सामना करावा लागला.  स्थानिक नेत्यांच्या मतभेदामुळे आधी घोषित झालेल्या काँग्रेसच्या यादीत अनेक बदल करण्यात आले. अनेकांचे तिकीट वेळेवर कापण्यात आलं तर काही नवीन उमेदवारांचं नाव समाविष्ट करण्यात आलं. या सर्व गोंधळामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी  राडा केला. तिकीट वाटपात आणि उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात विलास मुत्तेमवारांनी भेदभाव केला असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.

 

परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती लक्षात घेता काँग्रेस नेत्यांनी पोलिसांना पाचारण केलं. पण त्याचा उलटाच परिणाम झाला. कार्यकर्त्यांच्या या राड्यामुळे काही वेळ नेतेही धास्तावले होते. मात्र, तिकीट वाटपात कुठलाही गैरव्यवहार झाला असल्याचा इन्कार केला.उमेदवारी मिळाली नाही म्हणून संतापलेल्या कर्यकर्त्यांनी निवडणुकीत दगाफटका करण्याचा इशारा दिला आहे. कार्यकर्ते संतापल्यानं आता निवडणुकीत याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

[jwplayer mediaid="41653"]

[jwplayer mediaid="41661"]