प्रशांत परदेशी, www.24taas.com, धुळे
धुळे जिल्ह्यात NRHM योजनेत निकृष्ट दर्जोचे साहित्य खरेदी करुन आणि त्याचं बनावट बिल बनवून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आलाय. यासंदर्भात वर्षभरानंतर चौकशी समिती नेमण्यात आली. मात्र या समितीतील सदस्य आणि त्यांचा कारभार पाहता हा चौकशीचा फार्स आहे का अशी शंका उपस्थित होते.
धुळे जिल्ह्यात NRHM योजनेअंतर्गत राबविण्यात आलेल्या पल्स पोलीओ मोहिमेत अव्वाच्या सव्वा दर्जाने निकृष्ट दर्जोच्या साहित्याची खरेदी आणि बनावट बिल याच्या आधारे शासनाला लाखो रुपयांचा चुना लावण्यात आलाय. गेल्या वर्षभरापासून याच्या चौकशीची मागणी होत होती. तत्कालीन सीईओने धोत्रे नावाच्या अधिकाऱ्याला चौकशीचे आदेश दिले. मात्र त्याचे स्वतःचे हात यात गुंतले असल्याने त्याने चौकशी केली नाही. अखेर सुरु असलेल्या विधीमंडळ अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले.
त्यानंतर आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी चौकशी समिती स्थापन केली खरी मात्र यामध्ये समाविष्ट असलेल्या नऊ सदस्यांमध्ये तीन स्थानिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ज्यांचा या घोटाळ्याशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध आहे. त्यामुळे ही समिती सत्य शोधण्यासाठी की लपवण्यासाठी असा प्रश्न उपस्थित होतोय.
समितीचे सदस्य प्रकरणाच्या खोलात शिरायला तयार नाहीत. तीन दिवसात नेमकी कशाप्रकारे चौकशी केली जाणार आहे हे सांगायलाही ते तयार नाहीत. शासनाच्या विश्रामगृहात थांबण्