वाळू माफियांविरोधात नागरिक रस्त्यावर

वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरखाली चिरडल्याने एका सात वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना श्रीरामपूरमध्ये घडली आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने डंपरच्या काचा फोडत पेटवून देण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर डंपरचालक पसार झाल्याने स्थानिकांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं.

Updated: Apr 10, 2012, 05:24 PM IST

www.24taas.com, शिर्डी

वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरखाली चिरडल्याने एका सात वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना श्रीरामपूरमध्ये घडली आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने डंपरच्या काचा फोडत पेटवून देण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर डंपरचालक पसार झाल्याने स्थानिकांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं.

दुसरीत शिकणारी वृषाली मेणगर परीक्षेनंतर घरी परतत असताना या डंपरने तिला जोरदार धडक दिली. अपघातानंतर वृषालीचा लोणी इथल्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. मात्र तिथं नेण्याआधीच तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी संतप्त जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र जमावाने यावेळी अधिकाऱ्यांनाही धक्काबुक्की केली.

या घटनेचे पडसाद उशिरापर्यंत उमटले. संतप्त जमावाने मनमाड महामार्गावर टायर जाळून रास्ता रोकोही केला. श्रीरामपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दोषींवर कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागं घेण्यात आलं.